
फुलंब्री : फुलंब्री शहरातील किराणा व्यवसाय हिरालाल पाटणी यांचा मोठा मुलगा 2019 मध्ये सीए झाला होता. तर त्याचा लहान भाऊ युगल पाटणी हा देखील रविवारी लागलेल्या निकालामध्ये सीए बनला आहे. एकाच घरातील दोघेही सखे भाऊ सीए बनल्याने आई-वडिलांच्या कष्टाची चीज केले. भावाच्या सपोर्टने युगल सीए झाल्याचे त्यांनी सांगितले.