CM Mazi Shala Sundar Shala : जळगाव मेटेची जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात अव्वल ; शाळेचे होतेय कौतुक

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हा उपक्रम जिल्हाभर राबवून विविध शाळांचे मूल्यांकन केले. यामध्ये फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथील जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळेने जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले आहे.
CM Mazi Shala Sundar Shala
CM Mazi Shala Sundar Shalasakal

फुलंब्री : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हा उपक्रम जिल्हाभर राबवून विविध शाळांचे मूल्यांकन केले. यामध्ये फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथील जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळेने जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले आहे. या शाळेत शाळेचा परिसर, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, अत्याधुनिक शिक्षण आणि भौतिक सुविधा चांगल्या असल्यामुळे या शाळेने प्रथम क्रमांक पटकवला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अभियान राबवले. त्यासाठी शंभर गुणांचे मूल्यांकन करण्यात आले. मूल्यांकनात तीस मुद्द्यांवर काम करणे आवश्यक होते.

त्यात जळगाव मेटे येथील शाळेने अनेक बाबींवर गेल्या दहा वर्षांपासून उत्तमरित्या पालकांसह ग्रामस्थांच्या सहकार्याने काम केले. भौतिक सुविधांबरोबर गुणवत्तेवर भर देऊन नेहमी विद्यार्थी हिताचे उपक्रम शाळेत राबविले जातात. शिक्षण सुलभ होईल अशा सुविधा समाज सहभागातून निर्माण झाल्या. सेवाभावी संस्थांकडूनही शाळेला वर्गखोल्या प्रयोगशाळा (साहित्यसह) डिजिटल वर्गखोल्या मिळाले. त्याचबरोबर स्वच्छतागृहाची सुविधा मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना कृतीयुक्त व आनंददायी शिक्षण मिळण्यास मदत झाली. त्यामुळे शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या मिळालेल्या यशामध्ये शिक्षण विभागाचे विभागीय उपसंचालक अनिल साबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातून या शाळेला जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावता आल्याचे मुख्याध्यापक जाजेवार यांनी सांगितले.

या स्पर्धेतील मूल्यांकन

या स्पर्धेत शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा सहभाग, क्रीडा स्पर्धा, व्याख्याने, नवसारक्षरता अभियान, स्वच्छता मॉनिटर, बोलक्या भिंती, शाळेत विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मदतीने राबविण्यात आले. शाळेची आकर्षक इमारत, स्वच्छ व सुंदर परिसर, विविध वृक्षवेलींनी नटलेला शाळेचा परिसर, परसबाग, रोबोटिक लॅब, सोलर पॅनल, फिल्टर पाणी, हॅन्ड वॉश स्टेशन, प्लास्टिकमुक्त शाळा, तंबाखूजन्य पदार्थावर बंदी, विद्यार्थ्यांसाठी बचत बँक, स्काऊट गाइड यांच्या माध्यमातून ग्रामसफाई, पालक मित्र सहभाग, विषय मित्र सहभाग, शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ, अमृतवाटिका, विविध खेळ साहित्य अशा विविध मुद्द्यांनुसार शाळेने काटेकोरपणे नियोजन करून विद्यार्थी व पालकांच्या मदतीने शाळेचा विकास साधला.

तालुकास्तरावर या शाळांनी रोवला मानाचा तुरा

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत फुलंब्री तालुक्यातून गणोरी जि.प. प्रशालेने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला. निधोना जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेने तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक, शिरोडी खु.-वारेगाव जि.प. प्रा. शाळेने तृतीय क्रमांक पटकावला.

CM Mazi Shala Sundar Shala
Teachers Protest : शिक्षकांच्या आंदोलनांची विभागीय आयुक्तांकडून दखल ; विविध प्रश्नांवर होणार चर्चा

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले. अनेक उपक्रम शाळेत राबवून शाळेचा कायापालट केला. ग्रामस्थ व शालेय शिक्षण समितीचासुद्धा शाळेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे.

-नारायण जाजेवार, मुख्याध्यापक,

जिल्हा परिषद शाळा जळगाव मेटे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com