जेईई मेन्समध्ये औरंगाबादची समीक्षा चंडालिया राज्यात प्रथम

योगेश पायघन 
बुधवार, 15 मे 2019

महाराष्ट्रात औरंगाबादच्या गरखेडा परिसरातील समीक्षा कांतिलाल चंडालिया हिने प्रथम क्रमांक पटकावत ऑल इंडिया रँकिंगमध्ये 74 वे स्थान मिळवले आहे.

औरंगाबाद : जेईई मेन्स या प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिका दोनचा निकाल मंगळवारी (ता. 14) जाहीर झाला. वास्तूविशारद (आर्किटेक्चर) अभ्यासक्रमासाठीच्या या परीक्षेत महाराष्ट्रात औरंगाबादच्या गरखेडा परिसरातील समीक्षा कांतिलाल चंडालिया हिने प्रथम क्रमांक पटकावत ऑल इंडिया रँकिंगमध्ये 74 वे स्थान मिळवले आहे.

'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. जानेवारी आणि एप्रिल अशी दोन वेळा ही परीक्षा झाली. दरम्यान, दोन परीक्षांमधील सर्वोत्तम गुणच पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. घाटीतील औषधशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. के. सी. चंडालिया यांनी ती कन्या आहे. ऑल इंडिया रँकिंगमध्ये तिने 74 क्रमांक आहे. तिने जानेवारीत झालेल्या परीक्षेत 99.97 टक्के मिळवले होते. त्यामुळे तेच तिचे सर्वोत्तम गुण ग्राह्य धरण्यात आलेले आहे. राजबाजार परिसरात राहणारी समीक्षा वडील डॉक्टर असतांना स्वतःच वेगळं प्रोफेशन निवडले. नियमित अभ्यासाने मिळालेले हे यश असल्याचे तिने 'सकाळ'ला सांगितले. तर आवडत्या सर्वोत्कृष्ट संस्थेत ऍडमिशन मिळेल त्याचा आनंद असल्याचे सांगतांना तिच्यासाठी आई वडील व शिक्षकांनी केलेल्या मेहनत आणि सहकार्याबद्दल आभारही व्यक्त केले. महाराष्ट्र पब्लिक स्कुलची ती विद्यार्थिनी आहे. 

Web Title: Aurangabads students Samiksha Chandalia first in the state in JEE mains