महापालिकेत होणार परिवहन समिती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

औरंगाबाद - स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, ही बस सेवा सुरू होण्यापूर्वी परिवहन समिती स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी नगर सचिव विभागाला केल्या आहेत. स्थायी समिती सभापतीप्रमाणेच या समितीला महत्त्व राहणार आहे. 

स्मार्ट सिटी प्रकल्पातून महापालिका लवकरच शहर बस सेवा सुरू करणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात पाच इलेक्‍ट्रिक बस खरेदी करण्यास स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, निविदा प्रक्रियेसाठी विलंब लागणार असल्याने सर्व बस एकत्रितपणे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस सेवा चालविण्यासाठी कंत्राटदाराला दिली जाणार असून, त्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात येतील. त्याचबरोबर परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. या समितीमध्ये सभापतींसह 17 सदस्य राहणार आहेत. या समितीची रचना कशी असावी, अधिकार काय, याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्यासाठी महापौरांनी नगर सचिव विभागाला शनिवारी (ता.20) पत्र दिले आहे. त्यानुसार नगर सचिव दिलीप सूर्यवंशी यांनी इतर महापालिकांमधील परिवहन समितीची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर येण्याची शक्‍यता आहे. या समितीला स्थायी समितीप्रमाणेच महत्त्व राहील. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूरसह इतर महापालिकांमध्ये परिवहन समितीवर वर्णी लावण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू असते. 

Web Title: aurangabd news amc Transportation Committee