Aditya Thackeray and Omraje Nimbalkar
sakal
औसा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षाशी बंडखोरी करून शिंदे गटात गेलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत मात्र थेट भाष्य करणे टाळले. शेतकरी प्रश्नावर तावशी ताड येथे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या छावाचे विजयकुमार घाडगे यांची भेट घेण्यासाठी खासदार निंबाळकर आले नसल्याबाबत विचारले असता, ‘त्यांनी यायला हवे होते,’ एवढीच प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी या विषयाला अधिक बोलणे टाळले.