अपंग शेतकऱ्याने घेतले तहसील कार्यालयातच विष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

औसा - सावकाराला विक्री केलेली जमीन परत घेण्यासाठी बॅंकांनी कर्ज नाकारल्याने समदरगा (ता. औसा) येथील काशीराम शहाजीराव काळे (वय 30) या अपंग शेतकऱ्याने गुरुवारी (ता. 25) दुपारी येथील तहसील कार्यालयातच विषारी औषध प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

समदरगा (ता. औसा) येथील अपंग तरुण शेतकरी काशीराम काळे यांनी आपली जमीन पैशासाठी खासगी सावकाराला विक्री केली आहे. विक्री केलेली जमीन परत घेण्यासाठी त्याला बॅंकेकडून कर्ज हवे होते. या संदर्भात या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी, तहसीलदार व नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही मंत्र्यांपुढे आपली कैफियत मांडली होती. या जमिनीवरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने ही जमीन सोडविण्यासाठी बॅंकेकडून कर्ज मिळावे म्हणून हा शेतकरी धडपडत होता. येथील तहसीलदार अहिल्या गाठाळ यांनी अग्रणी बॅंकेला एका पत्राद्वारे या शेतकऱ्याला कर्ज देण्याची विनंती केली होती; परंतु बॅंकांनी या शेतकऱ्याच्या नावे अगोदरच कर्ज असल्याने व जमीन सोडविण्याला कर्जपुरवठा करण्यासाठी कोणतीच योजना नसल्याचे कारण सांगत याला कर्ज देणे नाकारल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा याची चिंता त्यांना लागली होती.

Web Title: ausa marathwada news farmer poison