औसा येथे भरदिवसा घरफोडी; वीस तोळे सोने लंपास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

औसा - शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गणेशनगरमध्ये भरदुपारी तीनच्या सुमारास घरफोडी करून चोरट्यांनी वीस तोळे सोने आणि रोख पावणेदोन लाख रुपये लंपास केले.

औसा - शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गणेशनगरमध्ये भरदुपारी तीनच्या सुमारास घरफोडी करून चोरट्यांनी वीस तोळे सोने आणि रोख पावणेदोन लाख रुपये लंपास केले.

पोलिसांनी सांगितले, की गणेशनगर येथील अशोक रावसाहेब पाटील हे सहकुटुंब शहरातीलच नाथनगरमध्ये राहणाऱ्या बहिणीकडे पाडव्यानिमित्त जेवणासाठी गेले होते. ते गेल्यानंतर पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील दोन कपाटे तोडून त्यातील लॉकरमधील वीस तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख 75 हजार रुपये लंपास केले. अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात हा प्रकार घडला. पाटील कुटुंबीय घरी परतल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आला.

Web Title: ausa news theft crime

टॅग्स