ॲटोवाल्याचा प्रामाणीकपणा; दागिण्याची बॅग केली परत 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 21 एप्रिल 2019

एका महिला प्रवाशाची विसरलेली सोन्याचे दागिणे असलेली बॅग ॲटोचालकांनी वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिस निरीक्षक संदीप शिवले आणि फौजदार श्री. राठोड यांनी सदरची बॅग महिला प्रवाशांच्या सुपूर्त केली. 

नांदेड - एका महिला प्रवाशाची विसरलेली सोन्याचे दागिणे असलेली बॅग ॲटोचालकांनी वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिस निरीक्षक संदीप शिवले आणि फौजदार श्री. राठोड यांनी सदरची बॅग महिला प्रवाशांच्या सुपूर्त केली. 

शहराच्या बजाजनगर भागात राहणाऱ्या एका सहशिक्षकांची पत्नी कविता अशोक जिकोले ह्या मंगळवारी (ता. सोळा) सकाळी दीपनगर येथून ॲटो ( एमएच२६-बीडी-१६२०) मधून मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत बाहेरगावी जाण्यासाठी बसल्या. मध्यवर्ती बस्थानक येताच त्या घाईत खाली उतरल्या.

यावेळी आपली बॅग ज्यामध्ये पन्नास हजाराचे शॉर्ट सोन्याचे गंठण व कपडे अशी त्या विसरल्या. तोपर्यंत अॅटो निघुन गेला होता. बॅग ॲटोत असल्याचे ॲटो चालक यशवंत जळबा चिखलीकर रा. जयभीमनगर यांनाही माहित नव्हते.

धावत धावत सदर महिला ही वजिराबाद पोलिस ठाण्यात आली. त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. यावेळी फोलिस निरीक्षक श्री. शिवले यांनी लगेच फौजदार श्री. राठोड व त्यांचा मदतनीस शरद चावर व आदी पथकाला सीसीटीव्ही फुटेज तपासायला सांगितले. यावेळी ॲटोची ओळख पटवून पोलिस पथक जय भीमनगर भागात पोहचले. पोलिस घरी येताच ॲटो मालक सुनिल खिल्लारे व चालक श्री. चिखलीकर यांनी बँग असल्याची कबुली दिली. त्यात असलेल्या दागिण्यासह ती बॅग पोलिसांच्या सुपूर्त केली. श्रीमती जिकोले यांना बोलावून घेऊन दागिण्यासह बँग सुपूर्त केली. यावेळी सदर महिलेनी ॲटोवाले व पोलिसांचे आभार मानले.

Web Title: Auto Driver Authenticity Jewellery Bag Return Police