

Dr. Bhagwat Karad Clarifies Credit Issue Over Outram Ghat Tunnel Project
Sakal
कन्नड : कोणी एकदा लोकसभेत किंवा विधानसभेत विषय मांडल्याने काही कोटींच्या योजना मंजूर होत नाहीत; त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा औट्रम घाटातील बोगदा आणि शहरातील पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न आम्ही सतत पाठपुरावा केल्याने मार्गी लागला आहे. त्यामुळे राजकारणासाठी कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व खासदार डॉ. भागवत कराड यांनी रविवारी (ता. ३०) रोजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.