विकास साखर कारखान्यास राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

लातूर - राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा सहकार व साखर उद्योगातील मानाचा सहकारनिष्ठ पुरस्कार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विकास सहकारी साखर कारखान्यास बुधवारी (ता. २६) प्रदान करण्यात आला.

सोलापूर येथे बुधवारी हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे अध्यक्षस्थानी होते. सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक आरोग्य, परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाच्या वतीने राज्यातील सहकारी संस्थांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून सहकारमहर्षी, सहकार भूषण व सहकारनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी विकास साखर कारखान्याची निवड झाली होती. राज्यपाल सी. विद्यासागर राव व विधानसभेचे सभापती बागडे यांच्या हस्ते कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद बोराडे, कार्यकारी संचालक समीर सलगर, युनिट दोनचे कार्यकारी संचालक अजित देशमुख व संचालकांनी पुरस्कार स्वीकारला.

संस्थात्मक कामकाज, व्यवस्थापकीय धोरण, गतिमान प्रशासन, सभासदांसाठीच्या कल्याणकारी योजना, ऊस विकास व कृषी यांत्रिकीकरण, पर्यावरण संवर्धन आदींचा विचार करून विकास कारखान्याला २०१५-१६ करिता हा पुरस्कार प्रदान झाला. 

आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विकास साखर कारखान्याने केलेली यशस्वी वाटचाल, संस्थात्मक कामकाज, सभासद व कर्मचारी यांच्यासाठी राबविलेल्या कल्याणकारी योजनांचे रज्यपालांनी कौतुक केले. संचालक रामचंद्र सुडे, नरसिंग बुलबुले, उमेश बेद्रे, युवराज जाधव, भैरवनाथ सवासे, रवींद्र काळे, चंद्रकांत टेकाळे, विलायतखान पठाण, जयचंद भिसे, गोवर्धन मोरे, नितीन पाटील, बालाजी साळुंके, रमेश थोरमोटे, जगदीश चोरमले, भारत आदमाने, कार्यालय अधीक्षक एन. बी. देशपांडे उपस्थित होते.

Web Title: Award of the Governor of Vikas Sugar Factory