बाबासाहेबांचे 12 पैलू अन्‌ 12 पुस्तके

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

औरंगाबाद - बाबासाहेबांच्या 12 पैलूंवर 12 पुस्तकांचा संच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशनने तयार केला असून, त्याचे मंगळवारी (ता. 17) लोकार्पण करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे संपादक प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (ता. 16) ही माहिती दिली.

औरंगाबाद - बाबासाहेबांच्या 12 पैलूंवर 12 पुस्तकांचा संच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशनने तयार केला असून, त्याचे मंगळवारी (ता. 17) लोकार्पण करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे संपादक प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (ता. 16) ही माहिती दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात सकाळी अकराला हा कार्यक्रम होईल. बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीनिमित्त ग्रंथ प्रकल्प साकारण्यात आला. यात 12 ग्रंथ आहेत. ही बारा पुस्तके कन्नड भाषेत अनुवादित होणार आहेत. तसेच उर्दू अनुवादही विचाराधीन आहे. येत्या डिसेंबरपर्यंत पुन्हा 13 पैलूंवर पुस्तके प्रसिद्ध केली जातील. ती पत्रकार, वकील, विधिज्ञ, आंदोलक, स्त्रीमुक्‍ती, जातिअंतप्रेरक, इतिहासतज्ज्ञ, पार्लमेंटरी, रचनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी पुस्तके असतील. सिद्धार्थ मोकळे यांनी, बाबासाहेबांचे विचार पुढे नेणारा आणि वैचारिक चळवळ बांधिलकी जोपासणारा हा प्रकल्प आहे, असे सांगितले.

प्रकाशनानिमित्त चार हजार रुपयांचा हा ग्रंथसंच दोन हजार रुपयांमध्ये प्राप्त होणार आहे. पत्रकार परिषदेला डॉ. इंद्रजित आल्टे, बुद्धप्रिय कबीर, डॉ. संजीवकुमार सावळे, डॉ. डी. एम. भोसले, सुकेश सोनुने आदींची उपस्थिती होती.

ग्रंथाचे लोकार्पण के. डी. पगारे, ऍड. मनोहर टाकसाळ, ऍड. बी. एच. गायकवाड, ऍड. भगवानराव देशपांडे, प्राचार्य ल. बा. रायमाने, अंबादासराव मानकापे, डी. एल. हिवराळे, शाहीर मीराबाई उमप, डॉ. प्रभाकरराव देशमुख, के. ई. हरिदास, शाहीर सखूबाई साळवे, जमुनाबाई गायकवाड, कलावती राठोड यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे असतील.

असा मिळवू शकाल संच
ग्रंथसंच पाहिजे असल्यास मूल्य डिपॉझिट करू शकता. यासाठी अधिक माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन प्रकाशन, बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा-सिडको, औरंगाबाद, खाते क्रमांक - 60243659764, आयएफएससी कोड - एमएएचबी 0000938 अशी आहे. मूल्य अदा केल्यानंतर 9172664757 या मोबाईल क्रमांकावर आपले संपूर्ण नाव आणि पत्ता एसएमएस करून आपला ग्रंथसंच घरपोच मिळवू शकता. यासाठी रोख रक्‍कम स्वीकारली जाणार नाही.

पुस्तकाचे नाव : लेखक
द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ : डॉ. यु. म. पठाण
नवसंस्कृतीचे जनक : डॉ. यशवंत मनोहर
राष्ट्रभक्‍त : डॉ. भूषण जोरगुलवार
अर्थशास्त्रज्ञ : डॉ. इंद्रजित आल्टे
समाजशास्त्रज्ञ : डॉ. प्रदीप आगलावे
जलतज्ज्ञ : डॉ. दत्तात्रय गायकवाड
दलितांचे व राष्ट्राचे हितकर्ते : डॉ. ज्ञानराज गायकवाड
राज्यशास्त्रज्ञ : डॉ. व्ही. एल. एरंडे
प्रशासक : डॉ. संभाजी खराट
संरक्षणतज्ज्ञ : प्रा. डॉ. विजय खरे
अंतर्गत सुरक्षा तज्ज्ञ : प्रा. डॉ. विजय खरे
विद्यार्थी : डॉ. विजयकुमार पोटे

Web Title: babasaheb ambedkar book