माझी चिमुकली गेली; इतरांचे जीव तरी वाचवा

माधव इतबारे
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

''माझी चिमुकली गेली; पण इतरांसोबत अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी काही तरी उपाय करा," असे आर्जव डेंगीमुळे मृत्युमुखी पडलेल्या आयुषीच्या कुटुंबीयांनी केले. महापौरांनी आश्‍वासन देत स्वतःची सुटका करून घेतली.

औरंगाबाद : ''माझी चिमुकली गेली; पण इतरांसोबत अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी काही तरी उपाय करा," असे आर्जव डेंगीमुळे मृत्युमुखी पडलेल्या आयुषीच्या कुटुंबीयांनी शनिवारी (ता. 28) महापौरांसह महापालिका अधिकाऱ्यांना केले. महापौरांनी आश्‍वासन देत स्वतःची सुटका करून घेतली.
 
शहरात डेंगीने थैमान घातले असून, गेल्या पाच दिवसांत पाच जणांचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (ता. 27) रंगारगल्ली येथील आयुषी रेणुकादास बोंबले या सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. शनिवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागात पहाटेपासून डास प्रतिबंधात्मक उपाय-योजना सुरू केल्या. आरोग्य विभागाच्या पथकासोबत महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुषीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आयुषीच्या वडिलांनी "माझी चिमुकली तर गेली मात्र, इतरांसोबत अशी घटना घडू नये यासाठी किमान तीन दिवसांआड पाणीपुरवठा करा' अशी मागणी केली. महापौरांनी आश्‍वासन देत स्वतःची सुटका करून घेतली.

व्यथित अजितदादांचे भावूक ‘कमबॅक’!

आयुक्त परतले 

शहरात डेंगीमुळे पाच जणांचे जीव गेलेले असताना आयुक्त डॉ. निपुण विनायक मात्र स्मार्ट सिटीमध्ये केलेल्या कामासंदर्भातील मिळालेला पुरस्कार स्वीकारण्यासाठी बेंगळरूला गेले होते. ते शनिवारी शहरात परतले; मात्र शनिवारीदेखील त्यांनी आढावा घेतला नाही. 

Vidhan Sabha 2019:युतीचं काही ठरेना; काय चाललंय भाजप-शिवसेनेचं?

संवेदनशील भागात द्या, तीन दिवसांआड पाणी 

महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणीपुरवठ्यासंदर्भात आयुक्तांना पत्र दिले असून, त्यात डेंगीचा ज्या भागात जास्त उद्रेक झाला आहे, अशा अतिसंवेदनशील भागात किमान तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करा, आशा सूचना करण्यात आल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baby Girl died of suspected dengue Father asked mayor to save others