Badnapur News : बदनापूर येथे कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणा देत केला राडा

अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील मराठा आंदोलक सुनील कावळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर केलेल्या आत्महत्येचे पडसाद शुक्रवारी (ता. २०) बदनापूर येथे कार्यक्रमात उमटले.
Maratha protestors raised loud slogans in badnapur event
Maratha protestors raised loud slogans in badnapur eventEsakal

बदनापूर - अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील मराठा आंदोलक सुनील कावळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर केलेल्या आत्महत्येचे पडसाद शुक्रवारी (ता. २०) बदनापूर येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना आदी पदाधिकारी व अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात "मेरी माटी मेरा देश, अमृत कलश यात्रा' आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल लाभार्थी मेळावा' या कार्यक्रमात उमटले.

हा कार्यक्रम सुरू असताना पंचायत समिती कार्यालयाच्या मुख्य गेटमधून दहा ते पंधरा मराठा आंदोलक जोरदार घोषणाबाजी करीत आत आले. अवघ्या ५० फूट अंतरावर हा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडविण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

यावेळी त्यांनी कालच चिकनगाव येथील मराठा आंदोलक सुनील कावळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुंबईत आत्महत्या केलेली आहे. ही घटना अवघ्या मराठा समाजाला व त्यांच्या कुटुंबीयांना व्यथित करणारी आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने हा कार्यक्रम का घेतला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी मराठा आरक्षणबाबत आपली असंवेदनशीलता दाखवली आहे, त्यामुळे आम्ही प्रशासन आणि पुढाऱ्यांचे निषेध व्यक्त करतो.

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत आम्ही बदनापूर तालुक्यात कुठलाही शासकीय आणि राजकीय कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी जोरदार भूमिका मांडत. आम्हाला किमान नेत्यांना निवेदन सादर करू द्या, अशी मागणीही त्यांना अडविल्यानंतर पोलिसांकडे केली.

यावेळी त्यांनी उपस्थित नेत्यांच्या निषेधाच्या घोषणा देत, 'आरक्षण आमच्या हक्काचे', 'मनोज जरांगे पाटील आगे बढो', 'मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना न्याय द्या" अशा घोषणा देऊन कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या लोकांचे लक्ष केंद्रित केले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न केले. यात आंदोलक आणि पोलिसात तब्बल अर्धातास धुमश्चक्री सुरू होती.

अखेर आंदोलकांना पंचायत समितीच्या मुख्य गेट मधून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर देखील आंदोलकांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडला. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन बदनापूर पोलिस ठाण्यात नेले, पंचायत समिती कार्यालयात सुरू असलेला कार्यक्रम संपल्यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले. यावेळी राम सिरसाठ, संतोष नागवे, बाबासाहेब शिंदे, शिवाजी अंभोरे, सावलहरी शिंदे यांच्यासह दहा - बारा मराठा आंदोलक सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com