नांदेड येथील डांबर गैरव्यवहारातील आरोपींना जामीन

नांदेड येथील डांबर गैरव्यवहारातील आरोपींना जामीन

नांदेड : येथील कोट्यवधी रुपयांच्या डांबर गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींना ए. एम. सय्यद यांनी दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी दोषारपपत्र दाखल केले होते. मात्र, या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार असून, पोलिसांना गुंगार देत आहेत.

नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते दुरूस्ती व देखभालीसाठी तर काही नवीन रस्ते तयार करण्यासाठी सन २०११ ते २०१३ या काळात जिल्ह्यातील बड्या कंत्राटदारांना कामाचे वाटप करण्यात आले होते. नियमानुसार या कंत्राटदारांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडून डांबर खरेदी करणे अपेक्षित होते. परंतु या कंत्राटदारांनी बनावट पावत्या तयार करून निकृष्ट दर्जाचे डांबर दुसऱ्याच कंपनीकडून घेतले. परंतु शासनाने नेमून दिलेल्या कंपनीकडूनच डांबर खेरदी केल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी आहे असे भासवून कोट्यावधी रुपयाचा अपहार करून भ्रष्टाचार केला होता. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्य्क अभियंता संदीप कोटलवार यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तीन सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या तक्रारीवरुन मोरे कन्सट्रक्शनचे मनोज मोरे, निखिला कन्सट्रक्शनचे भास्कर कोंडा, साईनाथ पद्मावार, मे. सोनाई कन्सट्रक्शनचे सतीश देशमुख, सी. एस. संत्रे आणि नुसरत कन्सट्रक्शनचे मोईज करखेलीकर यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे यांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत भास्कर कोंडा आणि मनोज मोरे या दोघांना अटक केली होती.

पोलिस कोठडी संपल्यानंतर हे दोघेजण नांदेड कारागृहात होते. दरम्यानच्या काळात सतीश देशमुख यांचे नाव चुकून फिर्यादीत आले होते, असे शपथपत्र दिल्यानंतर न्यायालयाने त्यांचे नाव यातून वगळले. परंतु सी. एस. संत्रे, मोईज करखेलीकर आणि साईनाथ पद्मावार हे अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांच्याकडे देण्यात आला. त्यांच्याकडूनही फरार कंत्राटदारांना पकडता आले नाही. अखेर दोषारोपत्र दाखल करताच न्यायालयीन कोठडीत असलेल्या या दोन्ही कंत्राटदारांना जामीन मिळाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com