नांदेड : कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका कर्जबाजारी शेतकऱ्याने विष पीऊन आत्महत्या केली. ही घटना (ता. १९) जूलै  घडली होती. 

 

नांदेड : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका कर्जबाजारी शेतकऱ्याने विष पीऊन आत्महत्या केली. ही घटना (ता. १९) जूलै  घडली होती. 

भोकर तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी बालाजी गायकवाड (वय ५०) यांच्या शेतावर मागील तीन वर्षापासून सतत नापिकी होत होती. यातून ते कर्जबाजारी झाले. प्रपंच कसा चालवायचा व कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत सापडलेल्या बालाजी गायकवाड यांनी (ता. १९) जूलैला विष पीले.

त्यांना नांदेडच्या विष्णुपूरी भागात असलेल्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती रुग्णालयीन चौकीचे पोलिस कांबळे यांनी दिल्यावर, भोकर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २४) आकस्मिक  मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदारजाधव हे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a bamkrupt farmer commits suicide at nanded