हिंगोली जिल्ह्यामध्ये बंदला मोठा प्रतिसाद

hingoli
hingoli

हिंगोली : पुलवामा येथील घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीसह जिल्ह्यात ठिकठिकाणी शनिवारी तरी 16 पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला या बंदमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला

पुलवामा घटनेच्या निषेधार्थ हिंगोली येथील व्यापारी महासंघाने बंदचे आयोजन केले होते. यावेळी व्यापारी महासंघाचे रमेशचंद्र बगडिया प्रकाश सोनी, उद्योजक ज्ञानेश्वर मामडे,  जेठानंद नेनवाणी, अॅड. मनिष साकळे, नगरसेवक अनिल नेनवाणी, श्याम खंडेलवाल, आनंद निलावार, अशोक बासटवार, धरमचंद बडेरा, सुभाष लदनिया, विजय हवालदार, प्रमोद मुंदडा, सुनिल मानका, पंकज अग्रवाल, दिपक सावजी, सुभाषचंद्र काबरा, यांच्यासह व्यापारी व नागरिक यांनी महात्मा गांधी चौकामध्ये येऊन बंदचे आवाहन केले.

या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार या ठिकाणीही बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ठीक ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com