धनगर आरक्षणासाठी माजलगाव-धारुमध्ये बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

माजलगाव/धारुर : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सोमवारी (ता. 13) जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. माजलगाव व धारुर शहरात बंद पाळण्यात येत आहे. बंददरम्यान दगडफेकीच्या किरकोळ घटनाही घडल्या. 

माजलगाव येथील संभाजी चौक व परभणी फाटा येथे चक्का जाम करण्यात आला. शहरातून फेरीही काढण्यात आली. येळकोट - येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा देण्यात आल्या. धारुरमध्येही बंद पाळण्यात आला. आष्टी, सिरसाळा येथेही ठिय्या आंदोलन आंदोलन करण्यात आले. 

Web Title: Bandh in Majalgaon-Dharu for Dhanagar reservation