Jalna News: बंजारा समाजाने उपोषणस्थळी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करत एसटी आरक्षणासाठी 'मेरा'ची मागणी केली. महिलांनी रिंग नृत्य, चूल, आणि दिव्यांच्या माध्यमातून आंदोलनाला नवा आयाम दिला.
जालना : हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाचा ‘एसटी’ प्रवर्गाच्या आरक्षणात समावेश करावा या मागणीसाठी शहरातील अंबड चौफुली परिसरात गेल्या पाच दिवसांपासून विजय चव्हाण यांचे उपोषण सुरू आहे.