ATM Theft : एटीएमची सुरक्षितता धोक्यात! शंभर दिवसात तीन वेळा 'एटीएम' वर चोरट्यांचा डल्ला

उमरगा शहरातील मुख्य मार्गावरील श्रीराम मंगल कार्यालयाच्या बाजुचे 'आयसीआयसीआय' बँकेचे एटीएम चोरट्याने गॅस कटरने फोडल्याची घटना रविवारी (ता. चार) पहाटे घडली.
ICICI Bank ATM Theft
ICICI Bank ATM TheftSakal

उमरगा, (जि. धाराशिव) - तालुक्यातील बलसूर येथील एटीएम दुसऱ्यांदा फोडल्याच्या घटनेनंतर चार दिवसाने उमरगा शहरातील मुख्य मार्गावरील श्रीराम मंगल कार्यालयाच्या बाजुचे 'आयसीआयसीआय' बँकेचे एटीएम चोरट्याने गॅस कटरने फोडल्याची घटना रविवारी (ता. चार) पहाटे घडली. त्यात रक्कम नसल्याची माहिती सांगण्यात आली. शंभर दिवसात तीन वेळा एटीएम वर दरोड्याच्या घटनेमुळे एटीएमची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील श्रीराम मंगल कार्यालयाच्या बँक ऑफ इंडियाच्या एका दुकानात दोन एटीएम मशिन आहेत. तर त्याला लागुनच असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या दुसऱ्या एटीएमची रविवारी पहाटे चारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडले. शेजारील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमला काहीही झाले नाही हे विशेष.

तालुक्यातील बलसुर गावात २५ ऑक्टोबर २०२३ च्या मध्यरात्री एटीएमवर दरोडा टाकत चोरट्याने २६ लाखाची रक्कम चोरून नेली होती. परत याच एटीएमवर ३० जानेवारी २०२४ आठ लाख रुपये लंपास केले होते. ही घटना चार दिवसापूर्वीच असताना चोरट्यांनी  आयसीआयसीआय एटीएम वर डल्ला मारला आहे. दरम्यान रविवारी पहाटे तीन वाजुन ५० मिनीटाच्या सुमारास पोलिसांची या एटीएमजवळ गस्त  होती.

मात्र सव्वा वाजुन दहा मिनीटाच्या सुमारास चोरट्यांनी चोरीचे धाडस केले. उमरगा पोलिसांचे तीन पथक व धाराशिवच्या गुन्हे अन्वेषन शाखेच्या दोन पथकामार्फत चोरट्यांचा शोध सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गोविंद शेलार, पोलिस निरीक्षक डी.बी. पारेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक व ठसा तज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते मात्र चोरट्यांनी त्यांच्या हाती काहीही पुरावे मिळणार नाहीत याची दक्षता घेतलेली दिसते.

सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांचे धाडस!

उमरगा शहरासह ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत, सहकारी बँकासह खासगी बँकाचे एटीएमची संख्या मोठी आहे मात्र त्याच्या सुरक्षिततेसाठी मोजक्याच एटीएमसाठी सुरक्षा रक्षक आहेत. शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे अँगल मर्यादित क्षेत्रापुरतेच आहेत. दरम्यान बलसुरच्या घटनेनंतर पोलिस निरीक्षक पारेकर यांनी शनिवारी (ता. तीन) सर्व बँकेच्या व्यवस्थापकांच्या बैठकीत एटीएमच्या सुरक्षिततेविषयी सुचना केल्या होत्या.

एटीएममध्ये कॅश टाकण्यासाठी आणि तांत्रिक दुरूस्तीसाठी स्वतंत्र एजन्सी आहेत. प्रत्येक एटीएम साठी विमा सुरक्षा कवच आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सुचनांत आर्थिकदृष्टया परवडणारे नसल्यान सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीविषयी फारसी स्पष्टता नाही. त्यामुळे एटीएम फोडण्याच्या प्रकाराला जणू संधीच मिळते आहे. पण कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणेची तत्परता एटीएमच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे असते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com