जिल्ह्यात एक हजार कोटींवर बॅंक व्यवहार ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

बीड - केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण राबवत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. 28) बॅंक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी संप पुकारल्याने बॅंका बंद राहिल्या. परिणामी जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याचा अंदाज आहे. 

बीड - केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण राबवत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. 28) बॅंक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी संप पुकारल्याने बॅंका बंद राहिल्या. परिणामी जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याचा अंदाज आहे. 

बड्या कर्ज बुडव्यांवर व कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, ग्रॅज्युईटी मर्यादा हटविण्यात यावी व यावर मिळणारी रक्कम करमुक्त करावी, बॅंकांमध्ये पुरेशी कर्मचारी भरती करावी, पाच दिवस बॅंकिंग करावी, केंद्र शासनाच्या धर्तीवर बॅंकांमध्येही अनुकंपा भरती करावी, नोटाबंदीच्या कालावधीत केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा, 11 व्या वेतन कराराची प्रक्रिया सुरू करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र आदी विविध बॅंकांमधील विविध संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले. यामुळे वरील सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या शाखा मंगळवारी बंद राहिल्या. परिणामी जिल्ह्यात मंगळवारी एक हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाल्याचा अंदाज आहे. 

युनायटेडची निदर्शने 
दरम्यान, युनायटेड फोरम ऑफ बॅंक्‍स युनियन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हैदराबाद बॅंकेसमोर निदर्शने करीत घोषणाबाजी केली. या वेळी राजेंद्र लव्हाळे, हैदराबाद बॅंकेचे मुख्य प्रबंधक श्रीनिवास, विलास कोकीळ, दिगंबर मुंडे, विनायक पाटील, मुकुंद भूतपल्ले, श्री. पानी, श्री. सोनटक्के, श्री. राठोड, लक्ष्मण खिल्लारे, जुगलकिशोर पल्लोड, आर. बी. तांदळे आदींसह कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले. 

Web Title: bank employee strike