लोकांनी संयम राखण्याचे बॅंक कर्मचाऱ्यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

लातूर -  शहर आणि जिल्ह्यातील स्टेट बॅंकांसह सर्वच बॅंकांमध्ये नव्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. लोकांनी सकाळपासून रांगा लावून त्रास करून घेण्याची गरज नाही. संयम राखून बॅंकेच्या वेळेतच नोटा बदलून घ्याव्यात, असे आवाहन स्टेट बॅंक ऑफ इंडिया एससी एसटी बॅकवर्ड क्‍लासेस एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात स्टेट बॅंकेसह सर्वच बॅंकांमध्ये पुरेशा प्रमाणात नोटा आणि त्याचे वितरण करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध आहेत. गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात नोटा वितरित करण्यात आल्या आहेत. लोकांनी गरज नसताना दोन-दोन वेळा बॅंका बदलून रांगा लावू नयेत, आवश्‍यकता असेल तरच बॅंकेच्या वेळेत येऊन नोटा बदलून घ्याव्यात. काहीजण उत्सुकतेपोटी गर्दी करीत असून 100, 500 च्याच नोटांची मागणी करीत आहेत. शिवीगाळ करणे, गोंधळ करणे, रांगांची शिस्त मोडणे असे प्रकार होत असून ते टाळावेत. नागरिकांच्या सोयीसाठी बॅंक कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करीत असून प्रत्येकाला नवीन नोटा मिळतील यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर एटीएमवर केवळ 100 च्या नोटा उपलब्ध आहेत. बॅंकांमधून केवळ 2000 च्या नोटांचे वितरण होत आहे. रांगेत थांबताना याची काळजी घेऊनच थांबावे.

संयम राखून बॅंकेच्या वेळेतच नोटा बदलून घ्याव्यात, असे आवाहन स्टेट बॅंक ऑफ इंडिया एससी एसटी बॅकवर्ड क्‍लासेस एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा सचिव आर. बी. इबितवार यांनी केले आहे.

Web Title: Bank employees appealed to the people to maintain restraint