esakal | Video : कर्तव्यावरील महिला कर्मचाऱ्यालाच महिला पोलिसांचा दंडुका
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli News

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सहाय्यीका कर्तव्य पार पाडून पोलिस जमादार असलेल्या वडिलांसोबत घराकडे जात होती. दरम्यान नांदेड नाक्यावर या दोघांचे काही ऐकून घेण्यापूर्वीच पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता. २५ मार्च २०२०) घडली. जाणुनबुजुन मारहाण केल्याचा आरोप पिडित महिला कर्मचाऱ्याने केला आहे.  

Video : कर्तव्यावरील महिला कर्मचाऱ्यालाच महिला पोलिसांचा दंडुका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली :  सध्या राज्यासह हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. बुधवारी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सहाय्यीका कर्तव्य पार पाडून पोलिस जमादार असलेल्या वडिलांसोबत घराकडे जात होती. दरम्यान नांदेड नाक्यावर या दोघांचे काही ऐकून घेण्यापूर्वीच पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता. २५ मार्च २०२०) घडली. जाणुनबुजुन मारहाण केल्याचा आरोप पिडित महिला कर्मचाऱ्याने केला आहे.  

अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रियंका साहेबराव राठोड या आरोग्य सहाय्यीका म्हणून काम करत आहेत. मस्तानशहानगर येथे कोरोना बाबत सर्वेक्षण करून गोरेगाव ठाण्यांतर्गत कनेरगाव नाका पोलीस चौकी येथे कर्तव्यावर असलेले वडील पोलिस जमादार साहेबराव राठोड यांच्यासोबत बांगरनगरला आपल्या घरी त्या जात होत्या.

नांदेड नाका येथे संचारबंदी कामी बंदोबस्तावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी त्या दोघांना काठीने मारहाण सुरु केली. विशेष म्हणणे ऐकून न घेता, ओळखपत्र न पाहता, आम्ही आरोग्य कर्मचारी आहोत, वडील पोलिस जमादार आहेत हे सांगूनही मारहाण केली, असा आरोप आरोग्य सहाय्यीका प्रियांका राठोड यांनी केला आहे. त्यांच्यावर हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून डोक्याला चार टाके पडले आहेत. विशेष म्हणजे संबंधित आरोग्य कर्मचारी या कॅन्सर पीडित असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिले आहे.

हेही वाचा - नो कोरोनासाठी घरोघरी करणार सर्वेक्षण

समाजासाठी काम करून मारहाण 
मी कोरोना बाबत मस्तानशाहानगर येथून सर्वे करून वडिलांसोबत घरी जात असताना नांदेड नाका येथे मला मारहान करण्यात आली. आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय ? पोलिसांकडून अशाप्रकारे अन्याय होत असेल तर आम्ही सर्व आरोग्य कर्मचारी काम थांबवू, असा इशारा प्रियंका राठोड यांनी दिला आहे. 
 
माझ्या मुलीला जनावरासारखा मारलं 
मी गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत कनेरगाव नाका येथे जिल्हा सीमा बंदीचा बंदोबस्त करून हिंगोली येथे शुगरच्या गोळ्या घेण्यासाठी आलो होतो. आरोग्य सेवेत असलेल्या माझ्या मुलींने मला फोन केल्यामुळे तिला घेऊन घरी जात असतांना नांदेड नाका येथे आमचे म्हणणे ऐकून घेण्यापूर्वी प्रभा पुंडगे यांनी माझ्या मुलीला बेदम मारहाण केली. जनावरालाही एवढे मारत नाहीत. कळस म्हणजे,  मारहण करणाऱ्या पोलिसांनीच माझ्या मुलीला दवाखान्यामध्ये भरती केले, असा संतप्त आरोपही पिडितेचे वडिल पोलिस जमादार साहेबराव राठोड यांनी केला आहे.   

हे वाचाच - संचारबंदीत पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना मारहाण

चक्कर आली म्हणून दवाखान्यात नेले  
माझ्यासह अन्य पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर होते. त्या दोघांना विचारपूस करण्यासाठी गेलो असता संबंधित महिला चक्कर आल्याने खाली पडली, त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला.  त्यानंतर आम्ही तिला घेऊन हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. संबंधित आरोग्य कर्मचारी महिलेला कोणतीही मारहाण केली नाही.  
- प्रभा पुंडगे (सहायक पोलिस निरीक्षक)

loading image