दुचाकी-ट्रॅक्टरच्या अपघातात बँक कर्मचारी ठार

जलील पठाण
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

औसा-तुळजापूर रस्त्यावर तावशी ताड ते चिंचोली काजळे या दरम्यान दुचाकी आणि ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील बँक कर्मचारी जागीच ठार झाला.

औसा (जि.लातूर ) ः औसा-तुळजापूर रस्त्यावर तावशी ताड ते चिंचोली काजळे या दरम्यान दुचाकी आणि ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील बँक कर्मचारी जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी (ता.१६) रात्री नऊ वाजता घडली. अमित देशपांडे (रा.टाका, ता. औसा) असे या मृत बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही दुर्घटना गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार टाका गावाचे अमित देशपांडे हे आशिव येथील लातूर जिल्हा बँकेत रोखपाल या पदावर काम करीत होते. बँकेचे काम संपवून आपल्या दुचाकीवरून ते आपल्या टाका या गावी निघाले होते. ते चिंचोली पाटीच्या पुढे आले असता तावशी पाटी जवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरशी त्यांची जोरात धडक झाली. देशपांडे यांनी हेल्मेट घातले असतानाही या धडकेत त्यांच्या हेल्मेटचे तुकडे झाले आणि डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - साई जन्मभूमीचा विकास हवा, त्यावर वाद नको

एक चांगला बँक अधिकारी म्हणून पंचक्रोशीत त्यांची ओळख होती. घटनास्थळी भादा पोलीस पोचले असून बिट अंमलदार श्री मंथलवाड यांनी उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलिसांकडून धडक देऊन पळून गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेतला जात आहे.

दोन दिवसांत चार दुचाकींची चोरी
लातूर शहरात दुचाकीचोरीचे सत्र कायम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत चार दुचाकी चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. शुभम धनंजय गडीमे (वय 26, रा. मजगेनगर) यांची कन्हेरी चौक परिसरातून दुचाकी चोरीला गेली आहे. याप्रकरणी त्यांनी मंगळवारी (ता. 14) विवेकानंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. उस्ताद इनाम उलहक इलियास (वय 27) यांची दुचाकी साळेगल्लीतून चोरीला गेली.

हेही वाचा - नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालय फोडले

त्यांनी याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 14) तक्रार दाखल केली आहे. इसामोद्दीन महंमद हनिफ शेख (वय 40, रा. पाखरसांगवी) यांनी टीना ऑईल भागात दुचाकी उभी केली होती. चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 15) तक्रार दाखल केली. असाच प्रकार विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतही घडला आहे. प्रतीक प्रकाश गोडभरले (वय 22, रा. रामवाडी) यांची दुचाकी मेघराजनगर भागातून चोरीला गेली आहे. याप्रकरणी त्यांनी बुधवारी (ता. 15) तक्रार दाखल केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank Staff Member Died In Accident