महिला पोस्टमनच्या माध्यमातून बँक गावात

फोटो
फोटो

नांदेड : पळशी (किनवट) येथील महिला पोस्टमन तुळसाबाई नारायण पुसनाके हे चूल आणि मूल संकल्पना मोडीत काढून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आजची महिला प्रत्येक क्षेत्रात काम करू शकते व पुरुषांपेक्षा मागे नाहीत हे दाखवून देत चक्क आदिवासी भागात जावून त्या टपाल विभागाकडून नागरिकांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून देत आहेत.  

आदिवासी भागात मांडवी हे गाव नांदेड पासुन शेवटचे टोक आहे. जवळपास दोनशे किलोमीटरवर पळशी बीओ आहे. आज देशात लॉकडाउनचा काळ असताना देखील महिला पोस्टमन प्रथम कर्तव्य जनसेवा व राष्ट्रसेवा म्हणून आपल्या टपाल वाटप सोबत. बँक सेवा देखील पोस्टमन मार्फत सहा गावात जाऊन करीत आहेत. ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिस एका खोलीत असते पण त्या पोस्ट ऑफिसमधून जवळपास दहा गावाचा पत्र व्यवहार आणि बँकेचे काम घरपोच महिला पोस्टमन करतात.

पोस्टमनच्या माध्यमातून बँक गावात
 
महिला पोस्टमन दररोज आपली बिटप्रमाणे साधा टपाल, स्पीडपोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, पार्सल विभागणी करून घेतात. तसेच या गावी जनधन, निराधार, रोजगार हमी लाभार्थी, विधवा पेन्शन, जेष्ठ नागरिक पेन्शन, इतर योजनाचे पैसे आयपीपीबी बँकिंग मायक्रो ATM व मोबाईल घेऊन लालूतांडा, पळशी तांडा, इंदिरानगर, आश्रमशाळा व पळशी या गावात पत्र वाटपासोबतच योजनांचे पैसे त्यांनी AEPS च्या माध्यमातून घरोघरी जाऊन काढून देत असतात. डाक विभागाच्या महिला पोस्टमन यांनी गावातच पोस्ट बँक घेऊन येत असल्याने या भागातील महिलांची पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा व डाक विभागाच्या योजनामध्ये पैसे जमा करण्याची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.

महिला पोस्टमन होणे एक वेगळा आनंद

असेच उन्हाळ्याचे दिवस होते. मी एका गावात पत्र वाटप करण्यासाठी गेलो होतो. दुपारच्या दोन वाजण्याच्या सुमारास त्या गावात लहान लहान मुले अंगणात खेळत होती.
मला पाहून त्यातील एक मुलाने आईला आवाज दिला आई पोस्टमन आली बघ.
मी त्या मुलाच्या आईचे बँकेतील खात्यातील पैसे AEPS द्वारे काढून देताना म्हणाल्या एवढ्या उन्हात पण पोस्ट बँकेचे व टपाल वाटप करीत असता. बाई तुम्ही पुरुषा पेक्षा काही कमी नाही. हे वाक्ये खुपच मोठं होत. या अगोदर मी हा शब्द कधीही ऐकला नाही.

डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत

भारतीय डाक विभाग. ग्रामीण भागातील वाड्या तांड्यात, गावात, शहरात डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांच्या नेतृत्वाखाली या संकटकाळी बँकेतील पैसे AEPS द्वारे घरपोच जनतेला पोस्टमन मार्फ मिळत असल्याने शेतीच्या मशागतिच्या कामाला गती मिळाली असल्याचे शेतकरी वर्गा मधून चर्चा होत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com