
केंद्रीय कृषीमंत्र्याने याबाबत आतापर्यंत कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीयकृत बँका पिक कर्जासाठी टाळाटाळ करत आहेत, अतिवृष्टिमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी, आम्ही महाराष्ट्रा सोबतच केंद्राचे सुध्दा शेतकरी आहोत अशा प्रकारचे बँनर सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपआपल्या बांधावर लावून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केला आहे. ‘
सेनगाव (जि. हिंगोली) - हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी शेतीच्या बांधावर ‘केंद्रीय कृषिमंत्री बांधावर दाखवा व बक्षीस मिळवा’ अशा प्रकारचे बॅनर लावल्यामुळे हा विषय तालुक्यात चर्चेचा झाला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एवढे होऊनही याबाबत केंद्र शासनाने ना दखल घेतली ना अद्याप कुठला निर्णय घेतला नाही. सोयाबीन, मुग, उडीद, कापूस आदी पिके लागवड करून झाल्यानंतर पावसाचा जोर अधिक वाढला व खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हेही वाचा - बांगडी विक्रेत्याच्या मुलीचे भन्नाट यश : क्लास न लावता घरी राहून अभ्यास करत मिळवला आयआयटीत प्रवेश
ओल्या दुष्काळाचे नवे संकट
मागच्या चार वर्षात या शेतकऱ्यांच्या पदरात काहीच शिल्लक राहिले नव्हते. त्यामुळे बँकेचे थकित कर्ज, खासगी कर्ज काढून कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांवर यावर्षी ओल्या दुष्काळाचे नवे संकट उभे राहिले. अतिवृष्टीमुळे सेनगाव तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही केंद्र शासनाकडून अद्याप कुठलीही मदत मिळाली नाही. शिवाय केंद्रीय कृषीमंत्र्याने याबाबत आतापर्यंत कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीयकृत बँका पिक कर्जासाठी टाळाटाळ करत आहेत, अतिवृष्टिमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी, आम्ही महाराष्ट्रा सोबतच केंद्राचे सुध्दा शेतकरी आहोत अशा प्रकारचे बँनर सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपआपल्या बांधावर लावून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केला आहे. ‘केंद्रीय कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दाखवा आणि बक्षीस मिळवा’ याबाबत सेनगावचे तहसीलदारांमार्फत थेट प्रधानमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
हेही वाचलेच पाहिजे - नांदेड : जिल्ह्यात बिबट्याचा संचार, हल्ल्यात वासरु ठार, शेतकरी भयभीत
शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी
सेनगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिक ६० टक्के पाण्याखाली आले असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे बँकांनी कर्ज वाटपास टाळाटाळ न करता सरसगट कर्ज वाटप करण्यात यावे.
- ओमप्रकाश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य.
केंद्र शासनाने दखल घ्यावी
गेल्या दोन महिन्यापासून झालेल्या मूसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचुन मुग, उडीद, सोयाबीन, कपाशी आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील केंद्र शासनाकडून एकही पाहणी करायला आले नाहीत.
- नामदेव पंतगे, शेतकरी नेते.