आमदार सोपल यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

बार्शी - येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप सोपल, तत्कालीन संचालक मंडळ आणि 101 कर्मचाऱ्यांवर 1 कोटी 5 लाख रुपयांचा अपहार व गैरव्यवहार केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 या कार्यकाळात हा गैरव्यवहार केल्याबद्दल सहकार खात्याचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक विष्णू वसंत डोके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार सोपल, माजी संचालक मंडळ व 101 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शीतील बाजार समितीमध्ये शीतगृह भाडेकरार, गाळेधारक व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणातील भाडे, नियमबाह्य हंगामी व रोजंदारी 103 कर्मचारी भरती; तसेच हंगामी व रोजनदारी 101 कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी व गैरहजर कालावधीत दिलेले वेतन यामध्ये अपहार व गैरव्यवहार झाला आहे.

बार्शीत तणावाचे वातावरण
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच बार्शी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केल्याने सकाळच्या सत्रात बाजारपेठेत शांतता होती; तसेच औद्योगिक वसाहत, उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी बंद पाळला.

Web Title: barshi marathwada news 125 people crime with mla dilip sopal