बीड : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी पळविली..अन पोलिसांनी कुटुंबियावरच केला गुन्हा दाखल..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

मौजे खडकी येथील २५ वर्षीय तरूणाचा विवाह कामखेडा येथील १६ वर्षीय मुलीशी १४ जुन रोजी झाला होता. ता.१५ जुन रोजी राञी आठच्या सुमारास नवविवाहित नवरी ही बाथरूमसाठी जात आहे. असे सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा वापस आलीच नाही.

वडवणी (बीड) : लग्न होऊन सासर घरी गेली. अन दुसऱ्याच दिवशी ती रात्री पळून गेली. सासरचे मंडळी चिंतेत पडले. माहेराला ही निरोप दिला. नवविवाहित वधू काही सापडेना. म्हणून अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला. पण तपासात आई वडिलांनी बाल विवाह घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अखेर पोलिसांनी दोन्ही कुटुंबावर गुन्हा दाखल केला. ही घटना घडली बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील मौजे खडकी या गावात. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

तालुक्यातील मौजे खडकी येथील २५ वर्षीय तरूणाचा विवाह कामखेडा येथील १६ वर्षीय मुलीशी १४ जुन रोजी झाला होता. ता.१५ जुन रोजी राञी आठच्या सुमारास नवविवाहित नवरी ही बाथरूमसाठी जात आहे. असे सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा वापस आलीच नाही. घरच्या मंडळींनी शोधाशोध केली. मात्र ती मिळाली नाही. अखेर मल्हारी सिताराम कांबळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात नवविवाहित नवरीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

सपोनि महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली राम बारगजे, चंद्रसेन माळी,  एन एस वडमारे, लखन गंगावणे हे करीत आहेत. तपास करताना नवविवाहित मुलीचे वय १६ वर्षे ६ महिने असल्याचे उघडकीस आल्याने राम बारगजे यांच्या फिर्यादीवरून बालविवाह अंतर्गत ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्हा बीड ग्रामीण पोलिस यांच्याकडे सोपविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BEED 16 YEAR OLD NEW MARRIED GIRL RAN AWAY ON THE SECOND DAY OF WEDDING