ऊसाचा ट्रॅक्टर उलटला जीवावर; भीषण अपघातात नवरा-बायको जागीच ठार

भास्कर सोळंके
Thursday, 7 January 2021

ही घटना बुधवारी मध्यरात्री दीड वाजता भेंड खुर्द नजीक माजलगाव पाथर्डी राष्ट्रीय  महामार्ग रस्त्यावर घडली

जातेगाव (जि.बीड ) : ऊसाने भरुन चाललेल्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रेलरमध्ये कार येऊन धडकल्याने कारमधील पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री दीड वाजता भेंड खुर्द नजीक माजलगाव पाथर्डी राष्ट्रीय  महामार्ग रस्त्यावर घडली.

तर दुस-या झालेल्या अपघातात उभ्या ट्रेलर दुचाकी धडकल्याने एक ठार झाला आहे. हा अपघात घटना सिरसदेवी  येथे घडला आहे. बनवस (जिल्हा परभणी) येथील कुटुंब नातलग यांच्या विवाह सोहळ्याला औरंगाबाद येथे एम एच 24 व्ही- 9257 कारने निघाले असताना भेंड खुर्द नजिक समोर ऊसाने भरुन चाललेल्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरमध्ये कार घुसल्याने कारमधील व्यकंट विश्वनाथ बल्लोरे(वय 60) सुलोचना व्यंकट बल्लोरे (वय 50)हे पती-पत्नी जागीच ठार झाले.

लातूरकडे धान्य घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचा अज्ञाताकडून खून

तर अहिल्याबाई बापुराव बल्लोरे,प्रताप अंकुश नळगिरे आणि एक पाच वर्षीय बालक जखमी झाले. जखमीना पुढील उपचारार्थ बीड येथे हलविण्यात आले तर अपघातात ठार झालेले पती-पत्नी यांचे मृतदेह जातेगाव येथील प्राथमीक आरोग्य  केंद्रात शवविच्छेदन करण्यास दाखल करण्यात आले आहे.

कार अपघातात एक ठार; जळकोट तालुक्यातील घटना

सदर घटना बुधवारी मध्यरात्री दिड वाजता घडली. तर सिरसदेवी येथील उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलर ला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील एक जण ठार झाल्याची घटना रात्री दहा वाजता घडली.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed accident news tractor car Majalgaon pathardi