लातूरकडे धान्य घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचा अज्ञाताकडून खून

युवराज धोतरे 
Thursday, 7 January 2021

बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास उदगीरहून लातूरकडे धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचा खून झाला आहे

उदगीर (जि.लातूर): करडखेल उदगीर रस्त्यावर बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास उदगीरहून लातूरकडे धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचा खून झाला आहे. याप्रकरणी अज्ञात गुन्हेगारावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आनंद तुळशीदास मोकाशे (वय-44) रा. आजनसोडा (ता.चाकुर) हा मंगळवारी ट्रक क्रमांक एम एच 09 सीयु 6900 यात उदगीरहून लातूरकडे मोडीत धान्य घेऊन निघाला होता. रात्री दहाच्या सुमारास लोहारा ते करडखेल या दरम्यान रस्त्याचे काम चालू असल्याने हा ट्रक मुरुमा मध्ये फसला.

कार अपघातात एक ठार; जळकोट तालुक्यातील घटना

हा ट्रक निघणे शक्य नाही सकाळी काढता येईल असा निरोप दिला व फसलेल्या ट्रकमध्ये झोपून राहिला.पहाटे चारच्या सुमारास या ट्रकचालकाचा तेथेच खून झाला असल्याचे नागरिकांना लक्षात आले. या ट्रकच्या  काचा फुटलेल्या खुना आहेत.

याप्रकरणी महत्त्वाचा भाऊ अशोक मोकाशे (वय-27) रा.अजनसोडा याने दिलेल्या जबाबावरून अज्ञात व्यक्तीने अज्ञात हत्याराने मयताच्या तोंडावर, छातीवर, पोटावर वार करून जीवे मारले. अशी तक्रार घेऊन अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गायके अधिक तपास करत आहेत.

मुरूडमध्ये बँकसमोरूनच दुचाकीच्या डिक्कीतून चोरले चार लाख रूपये

जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळी-
हा खून नेमका कोणत्या उद्देशाने झाला? या खुणा मागे लुटालुट आहे की अन्य कोणते कारण आहे? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे घटनास्थळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी प्रभारी  उपविभागीय  पोलिस अधिकारी श्री कोल्हे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur udgir crime news truck driver was killed by unknown