दोन मित्रांची 2021 ची शिवजयंती ठरली अखेरची! घरी परतत असताना अपघातात दोघांचा मृत्यू

accident11
accident11
Updated on

माजलगाव (जि. बीड) : शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी वसाहत येथे उसाने भरलेल्या उभ्या ट्रॉलीची धडक होऊन दुचाकीवरील दोन तरूण जागीच ठार झाले आहेत. हे तरुण शिवजयंतीवरून घरी परतत होते. तर या अपघातामध्येच एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. 21) रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

शहरापासून केसापूरी वसाहतकडे जात असलेल्या दुचाकीने उसाने भरलेल्या उभा असलेल्या ट्रॉलीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील रविराज रामहरी शेंडगे (वय 20 वर्षे) (रा.उमरी) तर विवेक भागवत मायकर (वय 21 वर्षे) (रा. पिंपळगाव नाकले) या दोन तरूणांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.

तिसरा ओंकार काळे हा देखील जखमी असून उपचारासाठी औरंगाबाद याठिकाणी हलविण्यात आले आहे. या अपघाताच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माजलगाव परिसरात मागील काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. याचं मुख्य कारण असुरक्षित उसाची वाहतूक तसेच ट्रॉलीला रिप्लेक्टर नसणे, अर्ध्या रस्त्यात ऊसाची ट्रॉली उभा करणे, यामुळे अपघातांची मालिका सतत सुरुच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com