

Family Injured After Ajit Pawar Convoy Vehicle Hits Bike in Beed
Esakal
बीड, किल्लेधारूर (ईश्वर खामकर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीने दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. धारूरहून केजच्या दिशेने अजित पवार यांचा ताफा जात असताना हा अपघात घडला. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजते.