esakal | बीड: पाचही संस्था प्रगतीपथावर अभिमान- जयदत्त क्षीरसागर । Beed
sakal

बोलून बातमी शोधा

Jaydatta Kshirsagar

बीड: पाचही संस्था प्रगतीपथावर अभिमान- जयदत्त क्षीरसागर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: रोपटे लावणे सोपे असते, मात्र त्या रोपट्याचे सचोटीने आणि पारदर्शकपणे संगोपण करून सांभाळणे अवघड असते. रोपट्यांचे वटवृक्षात रूपांतर ही बाब अभिमानास्पद आहे. आपल्या ताब्यात असणाऱ्या पाच संस्था आज प्रगतीपथावर आहेत. असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. ते आयोजित पाच संस्थांच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते.

हेही वाचा: पिंपरी : माहिती अधिकार दिन कागदावरच

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात असणाऱ्या आदर्श शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतपेढी, नवगण विनायक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था, श्री गजानन नागरी सहकारी बँक, श्री गजानन सहकारी सुत गिरणी व बीड तालुका खरेदी विक्री संघ या संस्थांची सर्वसाधारण सभा सोमवार (ता.27 रोजी) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

पुढे बोलताना ते म्हणाले सर्व ग्राहक आणि सभासदांचा विश्वास हेच आमचे भांडवल. आपल्या गजानन बँकेला 'अ' दर्जा मिळाला ही आपल्यासाठी पारदर्शक कार्याची पावती. कोरोनाच्या संकटात बँकेचे मुख्याधिकारी स्वामी यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबाला आपण पाच लाखाचा निधी मदतस्वरूपात देत आहोत.

हेही वाचा: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हवी शाळा

गजानन सुत गिरणीतून 29 कोटीचे सुत निर्यात करण्याचा मान आपल्याला मिळाला असल्याचेही माजी मंत्री क्षीरसागर यांनी सांगितले. संस्थेच्या सर्वसाधारण बैठकीत अहवाल वाचन प्राचार्य थिटे ए.एस., प्रा.कंधारे व्ही.एस., प्रा.जगदीश काळे, कार्यकारी संचालक विश्वनाथ काळे यांनी केले. प्रारंभी स्व.काकु-नानांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करून या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब मुंडे यांनी केले.आभार बाळकृष्ण थापडे यांनी मानले.

loading image
go to top