बीड : आमदार क्षीरसागरांसोबत रवींद्र क्षीरसागरही ग्राउंडवर

शिरूर तालुक्यात विकासकामांचे भूमिपूजन-लोकार्पण
 रवींद्र क्षीरसागर
रवींद्र क्षीरसागरsakal

बीड : आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत आता वडील रवींद्र क्षीरसागर पुन्हा सक्रिय झाले असून ग्राउंडवर उतरले आहेत. रायमोहा परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानींचीही त्यांनी पाहणी केली.

शिरूर कासार तालुक्यातील खरगवाडी, भानकवाडी, धनगरवाडी, टाकळवाडी येथील ग्रामस्थांशी क्षीरसागर पिता-पुत्रांनी संवाद साधला. तसेच या गावांत विविध विकास कामांचे भूमिपूजनही केले. सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य मदन जाधव, माऊली सानप, रामदास हंगे, शेख हशीम, प्रदिप सानप, अविनाश सानप आदी उपस्थित होते. यावेळी खरगवाडी येथे सौर पथदिवे, गावांतर्गत सिमेंट रस्ता, सभामंडपाचे भूमिपूजन व इतर अशा एकूण १४ लाख रुपयांच्या कामासह भानकवाडी येथेही सौरपथदिवे व दोन्ही ठिकाणी सभागृह अशा एकूण १९ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन झाले. धनगरवाडी येथे सौर पथदिवे व रौंधवस्ती येथे रस्ता सुधारणा अशा एकूण २६ लाख रुपये तर टाकळवाडी येथे सौरपथ दिव्यांचे १३ लाखांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

 रवींद्र क्षीरसागर
ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन; पाहा व्हिडिओ

बाह्यवळण रस्त्याबाबत क्षीरसागरांची पीडी काळेंसोबत पाहणी

शहरातून जाणाऱ्या जालना रस्त्यावरील बाह्यवळण रस्ता व बार्शी रोडवरील बाह्यवळण रस्ता हे शहरातील काम प्रलंबीत आहे. या कामातील तांत्रिक अडचणी दूर झाल्याने आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक श्री. काळे यांच्यासोबत रस्ता काम सुरू होण्याअगोदर प्रत्यक्ष पाहणी केली.

माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे आदी सोबत होते. शहरातून जाणाऱ्या जिरेवाडी, रामनगर, जालना रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी नाका ते कोल्हारवाडी फाटा बाह्यवळण रस्त्याची पाहणी केली. लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. या अंतर्गत नाल्या व इतर सुविधा तसेच नागरिकांच्या अडचणी श्री. क्षीरसागर यांनी यावेळी श्री. काळे यांच्या कानावर घातल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com