बीडमध्ये पोलिस कर्मचाऱ्यास बेदाम मारहाण, एकाला अटक

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला तीन मद्यधुंद तरुणांकडून मारहाण
Beed Ambajogai police officer beaten by three drunk person
Beed Ambajogai police officer beaten by three drunk personesakal

अंबाजोगाई : रात्रीच्या वेळी ड्युटी आटोपून घराकडे निघालेल्या अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला तीन मद्यधुंद तरुणांनी लाथाबुक्क्यांनी आणि साखळीने बेदम मारहाण केली. ही घटना शहरातील राजीव गांधी चौकाजवळ रविवारी रात्री घडली. याप्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. शुभम मोहनराव राऊत (वय २६) असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

राऊत हे सध्या अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी दिवसभराचे काम आटोपून रात्री १०.३० वा. ते दुचाकीवरून (एमएच ४४ आर ३२८६) घराकडे निघाले होते. राजीव गांधी चौकातील सेंट अंथोनी शाळेजवळ  मद्यधुंद अवस्थेतील बालू आदमाने (रा. एलआयसी कार्यालयाजवळ, अंबाजोगाई), कैलास भोसले (रा. वडारवाडा, अंबाजोगाई) आणि ओम या तिघांनी त्यांच्यासमोर दुचाकी आडवी लावून त्यांना अडवले.

तू पोलीसवाला असलास म्हणजे काय झाले, आम्ही या आधीपण पोलिसांना मारले आहे असे म्हणत त्यांनी राऊत यांच्या गणवेशाच्या कॉलरला पकडले आणि शिवीगाळ करत लाथाबुक्क्या, चापटा आणि लोखंडी साखळीने छातीवर मारत बेदम मारहाण करून जखमी केले. आमच्या नादाला लागलास किंवा केस केलीस तर आम्ही तुझ्यावर ॲट्राॅसिटीची केस करू अशीही धमकी दिली.

यावेळी राऊत यांनी तातडीने फोन करून ग्रामीण ठाण्यातील सहकारी कर्मचारी खंदारे, शिनगारे, केदार यांना बोलावून घेतले. त्यांना पाहताच त्या तिन्ही आरोपींनी दुचाकीवरून (एमएच ४४ एफ ५७८५) पळ काढला. सदर फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक घोळवे करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी कैलास भोसले याला अटक केली असून इतर दोघे फरार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com