पाशाभाई पटेल
पाशाभाई पटेलsakal

Beed : बांबू लागवडीतून आर्थिक उन्नती साधावी ; पाशाभाई पटेल यांचे शेतकऱ्यांना आवाहन

पोहनेर येथे बांबू लागवड मेळावा

परळी वैजनाथ : संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना व पोहनेर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित बांबू लागवड मेळाव्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना व पोहनेर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांबू लागवड मेळाव्यास पोहनेर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करून आर्थिक उन्नतीसोबत नैसर्गिक समतोल राखणे आवश्यक असल्याचे व बांबूपासून इथेनॉल, फर्निचर, कपडा यासह अनेक साहित्य तयार होत

असून यापुढे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करावी, तसेच बांबू लागवडीच्या प्रत्येक झाडामागे साडेसहाशे रुपये अनुदान सरकार देत असल्याचे व हेक्‍टरी १५×१५ वर लागवड केली तर साडेतीन लाख रुपये आणि ९×९ वर लागवड केली तर सात लाख रुपये अशा पद्धतीचे अनुदान शासनाकडून बांबू लागवडीला मिळत असते अशी माहिती पाशाभाई पटेल यांनी दिली. पुढे बोलताना शेतकऱ्यांनी ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच नदीकाठच्या जमिनी, पडीक जमिनी, नापीक असलेल्या जमिनी बांध, धुऱ्‍यावर बांबू लागवड करता येऊ शकते.

पाशाभाई पटेल
Sambhaji nagar : बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने ‘तारीख पे तारीख’ आता होणार बंद

येणाऱ्या काही वर्षांमध्ये जमिनीचे तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून तापमान पूर्ववत करण्यासाठी बांबू लागवड हा खूप मोठा पर्याय असून थर्मलला कोळशाऐवजी बांबूचा वापर होत आहे. साखर कारखान्यात इथेनॉल तयार करण्यासाठी सुद्धा बांबूचा वापर होत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी नैसर्गिक समतोल राखण्यासाठी या बांबू लागवडीचा फायदा घ्यावा व स्वतःची आर्थिक उन्नती करून घ्यावी. असे आव्हान शेतकऱ्यांना याप्रसंगी पाशाभाई पटेल यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुकियाबी अब्दुल रौफ कुरेशी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केले तर प्रमुख पाहुणे भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधाकर पौळ, तुकाराम गव्हाणे, प्रभाकर कदम, माऊली महाराज मुठाळ, बळीराम काकडे आदी होते.

पाशाभाई पटेल
Beed : शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांना धोक्याची घंटा! बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी नागरिक आक्रमक

हा कार्यक्रम शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष कैलास सोळंके यांच्या प्रयत्नातून झाला तर कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना व ग्रामपंचायत पोहनेर यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विष्णू रोडगे (पेंटर) यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com