esakal | Breaking: बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून भाजपाची माघार, पंकजा मुंडेंनी केली घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ संचालकांच्या निवडीसाठी शनिवारी (ता.२०) मतदान होणार आहे

Breaking: बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून भाजपाची माघार, पंकजा मुंडेंनी केली घोषणा

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : राज्यातील आणि जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा निषेध म्हणून आम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निषेध करत बहिष्कार करत असल्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.

बँकेत आम्ही वरचढ असल्याने कारस्थाने करुन सुरळीत चालणाऱ्या जिल्हा बँकेवर प्रशासक आणण्याचे कारस्थान सत्ताधारी करत आहेत. सर्व जागांची निवडणुक व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशिल होतो. न्यायालय व राज्यपालांपर्यंत आम्ही गेलो. मात्र, सहकार मंत्र्यांवर दबाव आणून हवे तसे निर्णय घेतले. औरंगाबाद व परभणी बॅंकेबाबत वेगळा व बीडसाठी वेगळा न्याय का, असा सवालही मुंडे यांनी केला.

Breaking: लातुरात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ संचालकांच्या निवडीसाठी शनिवारी (ता.२०) मतदान होणार आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे तळ ठोकून असून शुक्रवारी (ता.१९) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेही शहरात डेरेदाखल झाल्या होत्या. कोण काय डावपेच आखणार आणि कोणाला धोबीपछाड बसणार हे दोन दिवसांत कळणार होते पण त्याअगोदरच भाजपाने माघार घेतली आहे.

गंगापूर, वैजापूर तालुक्यासाठी पाईपलाईनव्दारे पाणी द्यावे; बारामती, इंदापूरच्या...

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकांच्या निवडीसाठी निवडणुक जाहीर झाली आहे. मात्र, तांत्रिक कारणांनी सेवा सोसायटीच्या ११ मतदारसंघातील सर्वच उमेदवारी अर्ज बाद झाल्याने केवळ सात मतदारसंघाच्या आठ जागांसाठी आता निवडणूक होत आहे.

loading image