esakal | चोरीपेक्षा चर्चा चोरट्यांच्या पीपीई किटची, पहा Video कसा घडला हा प्रकार !  
sakal

बोलून बातमी शोधा

chori beed.jpg

एका मेडिकल दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी प्रवेश करत ५० ते ६० हजारांची रोख रक्कम लंपास केली. पहाटे घडलेला प्रकार शुक्रवारी (ता. चार) समोर आला. मात्र, चोरीपेक्षा चोरट्यांनी वापरलेल्या पीपीई किटची चर्चा जास्त रंगली आहे. 

चोरीपेक्षा चर्चा चोरट्यांच्या पीपीई किटची, पहा Video कसा घडला हा प्रकार !  

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : येथील एका मेडिकल दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी प्रवेश करत ५० ते ६० हजारांची रोख रक्कम लंपास केली. पहाटे घडलेला प्रकार शुक्रवारी (ता. चार) समोर आला. मात्र, चोरीपेक्षा चोरट्यांनी वापरलेल्या पीपीई किटची चर्चा जास्त रंगली आहे. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

त्याचे झाले असे की, काळानुरुप हातसफाईची कला, अवजारांत बदल करण्याचे कसब तसे चोरट्यांत असतेच. पण, आता कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा काळ आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामान्य मास्क वापरत आहेत. तर, कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना पीपीई किट आवश्यक आहे. पण, या मेडिकल दुकानात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांनीही चक्क पीपीई किट घालून एंट्री केली. दुकानातील कुठल्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाही. 

तर जर हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. तर चेहरे आपला चेहरा दिसू नयेत यासाठी चोरट्यांनी पीपीई किटची नामी शक्कल लढविली आहे. बाजूच्याच एका दुकानातून टॅमी आणून मेडिकल दुकानाचे दोन फुट शटर उचकले. आणि आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील रक्कम घेऊन पोबारा केला. शहरातील साठे चौकात असलेल्या दिपक आहुजा यांच्या आहुजा मेडिकल दुकानात हा चोरीचा प्रकार घडला. याबाबत त्यांनी शहर पोलिसांत तशी तक्रार दिली आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

(संपादन-प्रताप अवचार)