Beed Crime - अल्पवयीन विवाहितेचा गळा दाबून खून 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

अल्पवयीन विवाहितेचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

वडवणी (जि. बीड) - तालुक्यातील चिखलबीड येथील शीतल दादासाहेब तोगे (वय १४) ही अल्पवयीन विवाहिता दोन दिवसांपसून घरातून बेपत्ता होती. तिचा मृतदेह माहेर असणाऱ्या पिंपळा शिवारातील एका उसाच्या शेतात सापडल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अल्पवयीन विवाहितेचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शीतल दादासाहेब तोगे हिचा विवाह एक वर्षापूर्वी झाल्याचे समजते. तिचे माहेर जवळच पिंपळा असून शीतल दोन दिवसापासून सासर चिखलबीड येथून बेपत्ता होती. सासर व माहेरकडील नातेवाईक तिचा शोध घेत होते. मात्र, शीतल हिचा मृतदेह पिंपळा येथील एका उसाच्या शेतात सापडला.

हेही वाचा - गेवराईत बोगस खतविक्री सुरूच, तब्बल साडेबारा लाखांचा साठा जप्त

वडवणी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. उत्तरीय तपासणी अहवालानुसार शीतलचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून वडवणी पोलिस ठाण्याचे चंद्रसेन माळी यांच्या फिर्यादीवरून बुधवारी (ता. एक) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक महेश टाक तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Crime - Murder by strangulation of a minor married woman