गेवराईत बोगस खत विक्री सुरुच, कृषी विभागाची कारवाई, तब्बल साडेबारा लाखांचा साठा केला जप्त

beed gevrai.jpg
beed gevrai.jpg
गेवराई (जि.बीड) : तालुक्यात खरिपाची पेरणी झाल्यानंतर पिकाला खताची मात्रा देणे गरजेचे असते. यासाठी शेतकरी खताची खरेदी करत असतात; परंतु तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक बोगस खताची विक्री करत शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे चकलांबा ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून दिसून येत आहे. दरम्यान, खते तपासणी अधिकाऱ्यांनी बोगस खते घेऊन जाणाऱ्या ट्रकला पकडून चालक व क्लिनरवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत बारा लाख पन्नास हजारांचा बोगस माल जप्त करण्यात आला आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

जिल्ह्यासह तालुक्यात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातून मोठ्या प्रमाणात बोगस खत आणि बी-बियाणे विक्रीसाठी आणले जात असून गुजरातमधील एका बोगस कंपनीच्या बियाणांचा तब्बल साडेबारा लाख रुपयांचा साठा बुधवारी (ता. एक) गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथे जप्त करण्यात आला आहे. पौळाचीवाडी येथे ट्रकमध्ये (एमएच १२ एचडी २४९४) रयल फर्टिलायझर प्रा.लि.या उत्पादक आणि वितरक कंपनीच्या ऑरगॅनिक मॅन्युअर व ऑरगॅनिक ग्रान्युअल्स न्यू प्लॅटो पल्सच्या पन्नास किलोच्या २४० बॅग ज्यावर जयकिसान समृद्धी व दाणेदार असे नावे होती.

ही सर्व खाते बोगस असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे व पंचायत समिती कृषी अधिकारी अनुरुद्ध सानप यांनी छापा टाकून खताचा साडेबारा टनापेक्षा जास्त साठा जप्त केला. पाहणी केल्यानंतर हे खत शेतकऱ्यांची फसवणूक व दिशाभूल करणारे असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्याच्या उद्देशाने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येत असल्याचे लक्षात आले. पकडलेल्या ट्रकचालक व क्लिनर संदीपान खाडे आणि ऋषिकेश खाडे यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

यामुळे हा माल कोणाचा व कोणत्या ठिकाणी जात आहे, याची माहिती मिळाली नाही. यामुळे विनापरवाना हे उत्पादन होत असल्याचे दिसून आल्याने ट्रक चालक व क्लिनर या दोघांसह खत उत्पादक कंपनीचे मालक, संचालक, रसायनशास्त्रज्ञ आणि मेहुलकुमार भवनजी गिनोए यांच्याविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपधीक्षक स्वप्नील राठोड पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com