esakal | सुखकर्ता अर्बन निधी बँकेच्या चेअरमनचा मृतदेह आढळला विहिरीत, घातपाताचा पोलिसांना संशय 
sakal

बोलून बातमी शोधा

Aashti news

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात आला आहे

सुखकर्ता अर्बन निधी बँकेच्या चेअरमनचा मृतदेह आढळला विहिरीत, घातपाताचा पोलिसांना संशय 

sakal_logo
By
निसार शेख

आष्टी (बीड): आष्टी शहरातील अहमदनगर - जामखेड मार्गावरील महात्मा फुले चौकातील सुखकर्ता अर्बन निधी बँकेच्या चेअरमनचा मृतदेह आढळला आहे. आष्टी पासून जवळच असलेल्या धनवडेवस्ती जवळील विहिरीत शनिवारी (ता.१०) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

आष्टी पोलिसांनी सदरील मृतदेह ताब्यात घेऊन प्रथम आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. परंतु गळ्यात कमरेचा पट्टा व डोळ्याजवळ जखमा आढळून आल्याने पोलिसांना घातपात असल्याचा संशय आल्याने सदरील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह

आष्टी येथील सुखकर्ता अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब शिरसाट (वय-४४) हे दोन दिवसांपासून आष्टी शहरातून बाहेर होते अशी चर्चा आष्टी शहरात होती. परंतु
शनिवारी धनवडे वस्तीजवळील भैरू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत शिरसाठ यांचा मृतदेह दिसून आल्याने एकच खळबळ उडाली.

आष्टी पोलिसांना सदरील घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक भारत मोरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल रियाज पठाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढला. बाळासाहेब शिरसाठ यांचा मृतदेह आढळून आल्याने आष्टी शहरात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे.