
सारुळ (ता. केज) माहेर असलेल्या प्रियंका ढाकणेचा कळंब येथील पेशाने डॉक्टर असलेल्या विशाल प्रल्हाद घुगे याच्याशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
बीड : मुलाच्या हव्यासापोटी डॉक्टर पतीकडून पत्नीचा छळ होत असल्याची घटना कळंब (जि. उस्मानाबाद) येथे घडली. पतीकडून जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप जखमी पत्नीने केला. मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गरिबीने केली थट्टा! अंत्यविधीसाठी मृतदेह गावी नेण्यासाठी नातलगांकडे पैसे नव्हते
सारुळ (ता. केज) माहेर असलेल्या प्रियंका ढाकणेचा कळंब येथील पेशाने डॉक्टर असलेल्या विशाल प्रल्हाद घुगे याच्याशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पहिली मुलगी झाल्याने प्रियंकाला घरात सासरच्याकडून मुलासाठी त्रास दिला जाऊ लागला. मात्र दुसऱ्यांदा मुलगा होईल या अपेक्षेने थोडा त्रास कमी झाला होता.
मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा
मात्र, पाच महिन्यांपूर्वी दुसरी मुलगी झाल्याने तेव्हापासून पती आणि सासरच्या मंडळीकडून मारहाण करत शारीरिक मानसिक त्रास दिला जात होता. त्यातच रात्री याच कारणावरून पतीने मारहाण करत चार महिन्याच्या मुलीसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रियंका सुदैवाने सुटका करून घेण्यात यशस्वी झाली आणि बसस्टँडवर येऊन माहेरच्या मंडळींना फोन केला. तिला उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र चार महिन्यांची मुलगी अद्यापही राहत्या घरीच आहे.
Edited - Ganesh Pitekar