
खर्चासाठी चुलत्याने पैसे नाही दिल्याचा मनात राग धरून भर रस्त्यावर पुतण्याने चुलत्याला संपविलं आहे
घाटनांदूर (जि.बीड) : खर्चासाठी चुलत्याने पैसे नाही दिल्याचा मनात राग धरून भर रस्त्यावर पुतण्याने चुलत्याला संपविलं आहे. पुतण्याने चुलत्यावर तीक्ष्ण हत्याराने डोक्यात हातावर व शरीराच्या इतर भागावर सापसप गंभीर वार केल्याने चुलता ठार झाल्याची घटना (ता.4) सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान येथे घडली आहे.
येथील जनार्धन मुंजा धोंगडे(चपला बुटाचा आठवडी बाजारात विक्रीचा व्यवसाय) (वय५५) यांना चुलत पुतण्या अर्जुन दत्तात्रय धोंगडे (वय२८) याने (ता.३) रविवारी खर्चीण्यासाठी उसने पैसे मागितले होते. चुलते जनार्धन धोंगडे यांनी पैसे देण्यास नकार दिला. पैसे देण्यास नकार दिल्याने पुतण्या अर्जुन धोंगडे यांच्या मनात राग बसला होता.
दहा ग्रामपंचायती बिनविरोध; राजकारणाचे केंद्र असलेली मुळज ग्रामपंचायत बिनविरोध
सोमवारी परळीचा आठवडी बाजार करून घाटनांदूर येथील संत रोहिदासनगर येथील घराकडे जनार्धन धोंगडे जात होते. त्यावेळेस त्यांच्या पाळतीवर असलेल्या चुलत पुतण्या अर्जुन दत्तात्रय धोंगडे याने अचानक कुकरीसारख्या तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, हातावर व शरीराच्या इतर भागावर सपासप वार करून भररस्त्यात चुलत्यास गंभीररित्या जखमी केलं.
जनार्धन धोंगडे यांना अंबाजोगाईच्या ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर त्याच्या मृत्यू झाला. फरार होत असलेल्या आरोपीस पोलीस कॉनिस्टबल अनिल बिकड यांनी ताब्यात घेतले असून अंबाजोगाई पोलिस उपाधीक्षक सुनील जायभाये, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महादेव राऊत यांनी रात्री उशिरा दहा वाजता घटना स्थळाची पाहणी केली आहे.
परभणी : कुटुंब नियोजनात पुरुष पिछाडीवर, वर्षभरात दोन पुरुषांची तर २१६ महिलांची नसबंदी
रात्री बाराच्या दरम्यान मयताची मुलगी वैशाली भ्र. बापूराव वाघमारे हिच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीनिवास सावंत करत आहेत.
(edited by- pramod sarawale)