Beed Crime News : बीडच्या अंबाजोगाईत एकाचा दगडाने ठेचून खून

Beed crime News
Beed crime Newsesakal

अंबाजोगाईः बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील मोंढा रोडवर शुक्रवारी (ता.८) सकाळी ११ च्या दरम्यान एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. दुपारी उशिरापर्यंत घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७, रा. महसूल कॉलनी, अंबाजोगाई) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी दगड व लाकडी दांड्याने राजेंद्र यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात राजेंद्र यांचा जागेवर मृत्यू झाला.

Beed crime News
Nawab Malik : ''नवाब मलिक आमच्याबरोबर आहेत, असा आमचा दावा नाही'', प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली भूमिका

भरदिवसा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रोडवर घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणास्तव झाला ते स्पष्ट झाले नसून अधिक चौकशीत ते निष्पन्न होईल असे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com