हृदयद्रावक! आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या अबोधने उपचार सुरु असताना पुन्हा आत्महत्या करुन घेतला जगाचा निरोप

beed suicide news
beed suicide news

बीड: आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या आणि सध्या उपचार सुरु असलेल्या तरुणाने जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान, जखमी तरुणाकडे डॉक्टर वेळेत उपचारासाठी आले नसल्याचे समोर आले. अबोध अशोक भोसले (वय ३१, रा. सावरगाव, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सावरगाव (ता. भूम) येथील अबोध भोसले घोडनदी शिरुर कासार येथे राहत होता. शिक्षण पदविका घेतलेल्या अबोधने काही दिवसांपूर्वी गळफास लाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यातून तो वाचला. त्यामुळे त्याला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचाराचा खर्च परवडत नसल्याने त्याला दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नाळवंडी नाका भागातील स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञ व भिषकांकडून उपचार सुरु होते. दरम्यान, त्याने रविवार - सोमवारच्या मध्यरात्री रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यारुन उडी घेतली. यात तो जखमी झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, जखमी झालेल्या अबोध भोसले याची डीएमओने तपासणी केल्यानंतर त्यांनी संबंधीत तज्ज्ञांना कॉल दिले. परंतु, काही डॉक्टर वेळेत आले नसल्याचा आरोप हेात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com