esakal | बीडमधील बनावट दारू कारखान्याचा मालक कोण? छाप्यात सहा आरोपी अटक, ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Crime News Fake Liquor Factory

अधिक चौकशीत बीडमध्ये एमआयडीसीमध्येही अशाच प्रकारे बनावट दारू बनविली जात असल्याचे समोर आले. त्यावरुन एमआयडीसीमध्येही छापा टाकला.

बीडमधील बनावट दारू कारखान्याचा मालक कोण? छाप्यात सहा आरोपी अटक, ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : तालुक्यातील नागापूर येथील बंद जिनींगमध्ये देशी दारूचा बनावट दारू कारखाना बुधवारी (ता. सात) रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाने उद्ध्वस्त करून सहा आरोपींना अटक केली. पण, कारखान्याचा मालक कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. कारवाईत ८६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. एक आरोपी फरार झाला. 
नागापूर शिवारात बनावट दारूचा कारखाना सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरून बुधवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, निरीक्षक डी. एल. दिंडकर, एस. ए. सांगुळे आदींनी छापा टाकला. यावेळी भागवत प्रभाळेच्या बंद जिनींगमध्ये स्पिरिट, तयार केलेली बनावट दारू, पाणी फिल्टर, कॉम्प्रेसर यंत्र, रिकामे बॅरल, पाच वाहने, देशी दारूच्या बाटल्या, विद्युत पंप, बनावट देशी दारुचे स्टिकर्स आदी ८२ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळला.

धक्कादायक! कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे कळताच उडाला एकच गोंधळ, अनेकांनी काढला पळ  

अधिक चौकशीत बीडमध्ये एमआयडीसीमध्येही अशाच प्रकारे बनावट दारू बनविली जात असल्याचे समोर आले. त्यावरुन एमआयडीसीमध्येही छापा टाकला. तेथून तीन २३ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. एकूण ८६ लाख एक हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्ककडे जवान एस. ए. सांगुळे यांच्या फिर्यादीवरून राजू किसन चव्हाण, ऋषीकेश राजू चव्हाण, रोहित राजू चव्हाण, आकाश वेताळ लोकरे, विक्की वेताळ लोकरे (सर्व रा. नवनाथनगर, बीड), निखिल कचरु घुले (रा. पांडुरंगनगर, बीड), रवींद्र किसन चव्हाण (रा. जुना मोंढा, बीड) यांच्यावर गुन्हा नोंद झाला. यातील रोहित चव्हाण फरार असून उर्वरित आरोपी अटकेत आहेत. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सदर जिनिंग गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. त्यात बनावट दारूचा कारखाना थाटून हा सगळा गोरखधंदा बिनबोभाट सुरु होता. एमआयडीसीमधील कारखान्यातून एक नोटा मोजण्याचे यंत्र जप्त करण्यात आले. यावरुन या धंद्यातील व्यवहाराचा अंदाज येऊ शकतो. 

कोरोना नियम मोडल्याने वधूवरासह ३०० जणांवर कारवाई, थाटात लग्न करणे पडले महागात

मास्टर माईंड कोण? 
बनावट दारू तयार करणाऱ्या लोकांना अटक केली असली तरी दोन ठिकाणी एकाच बनावट दारू कारखान्यांचे कनेक्शन समोर आले आहे. याचा मालक आणि मास्टरमाईंड कोण असा सवाल उपस्थित होत आहे. चौकशीत हे नाव समोर आणले जाईल की काम करणाऱ्यांवरच कारवाई करून मास्टरमाईंड मोकळा सोडला जाईल, हे पाहावे लागेल. 

Edited - Ganesh Pitekar

loading image