बीडमध्ये शनिवारी रात्री तरुणाचा छातीत गोळी लागून मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या आहे की हत्या हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाहीय. शनिवारी रात्री घडलेल्या घटनेनं बीडमध्ये खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यात घडलेल्या घटने प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलीय. अधिक तपास पोलीस करत आहेत.