बीडमध्ये कोठडीत असलेल्या सभापतीच्या जागी नव्या व्यक्तीचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

बीडमध्ये कोठडीत असलेल्या सभापतीच्या जागी नव्या व्यक्तीचा शोध सुरू

बीड - मारहाणीच्या एका प्रकरणात महिनाभरापासून न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे बीड जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे यांचे पद धोक्‍यात आले आहे. पद रिक्त समजून या पदाची सुत्रे कोणाकडे द्यायची याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागविले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमानुसार एखादा पदाधिकारी महिनाभरापेक्षा जास्त रजेवर असेल तर त्याचे पद रिक्त समजले जाते. बीड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे हे जामखेड येथील मारामारीच्या प्रकरणात एक महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. जामखेड येथे नाहोलीमधील सरपंचावरील अविश्‍वास ठरावादरम्यान दगडफेक करत सभापती निवासाचे नुकसान आणि घरफोडी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखला झाला होता.

अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न फोल ठरल्यावर ते पोलिसांकडे शरण आले होते. अटकेनंतर 16 ऑक्‍टोबरपासून गर्जे न्यायालयीन कोठडीत आहेत. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल सरकारकडे पाठवला असून समाजकल्याण सभापतीपदाचा पदभार कोणाकडे सोपवायचा अशी विचारणा केली आहे. गर्जे हे माजी मंत्री सुरेश धस यांचे समर्थक समजले जातात.

Web Title: Beed in the custody of the Speaker in person launched a new search