Video: बेशुद्ध लेकीला खांद्यावर घेऊन बाप पायीच निघाला; रुग्णवाहिकेतून उतरवलं, डॉक्टर म्हणाले, पोरं कशाला पैदा केले...

Beed Ambulance Denied Over Diesel Money: व्हायरल व्हिडीओ बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात असलेल्या दिंद्रुड प्राथमिक आरोग्य केंद्रातला आहे. दि. २९ सप्टेंबर रोजीचा हा व्हिडीओ असून ही ११ वर्षांची मुलगी फीट येऊन बेशुद्ध पडली होती.
Beed ambulance denial row

Beed ambulance denial row

esakal

Updated on: 

PHC Viral Video: सोशल मीडियात एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक मुलगी बेशुद्ध पडलेली आहे. तिच्या वडिलांनी तिला कडेवर घेतलंल आहे.. तिने बापाच्या खांद्यावर मान सोडून दिल्याचं दिसतंय. या मुलीला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत होतं. मात्र तिथे जे घडलं ते माणुसकीला काळीमा फासणारं होतं. राज्याच्या आयुष्यमान भारत समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्याच गावात हा प्रकार घडल्याने यंत्रणेविरोधात संताप व्यक्त होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com