शेंगदाणे, केळीची दिली लालूच...अन् सुरु झाला माकडांचा जेरबंदीचा खेळ..

प्रशांत बर्दापूरकर
Friday, 17 July 2020

शहर परिसरातील मोरेवाडी भागात मागील चार महिन्यापासून उच्छाद घालणारी माकडांची टोळी शुक्रवारी (ता.१७) सकाळी जेरबंद केली. येथील वन विभागाने बोलावलेल्या सिल्लोडच्या समाधान गिरी व संदिप गिरी यांच्या टिमने अत्यंत सावधगिरी बाळगत दोन पिल्लासह सहा माकडांना पिंज-यात बंद केले. येथील वन विभागाच्या रोपवाटीकेत आणखी दोन माकडे पिंज-यात बंद करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरुच होते.

अंबाजोगाई (बीड): शहर परिसरातील मोरेवाडी भागात मागील चार महिन्यापासून उच्छाद घालणारी माकडांची टोळी शुक्रवारी (ता.१७) सकाळी जेरबंद केली. येथील वन विभागाने बोलावलेल्या सिल्लोडच्या समाधान गिरी व संदिप गिरी यांच्या टिमने अत्यंत सावधगिरी बाळगत दोन पिल्लासह सहा माकडांना पिंज-यात बंद केले. येथील वन विभागाच्या रोपवाटीकेत आणखी दोन माकडे पिंज-यात बंद करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरुच होते.
अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.
असा होता उच्छाद 
शहरात चार महिन्यापूर्वी मोरेवाडी परिसरात ही माकडांची टोळी दाखल झाली होती. त्यात चार नर दोन मादी व दोन पिल्ले असा हा समूह होता. त्यांचा मोरेवाडीसह अभियांत्रिकी महाविद्यालय, या भागातील विविध कॉलनी व वन विभागाच्या रोपवाटीकेत संचार होता. लोकांच्या अंगावर जाणे, गच्चीवर वाळत घेतलेल्या अन्नधान्यावर ताव मारणे असा उच्छाद घातला होता. त्यामुळे या माकडांची अनेकात भिती बसली होती. माकडांच्या या त्रासाला कंटाळून नागरिकांनी वनविभागाचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधीकडे ही समस्या मांडली होती. 
लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
येथील वनपरिमंडळ अधिकारी शंकर वरवडे यांनी सिल्लोडचे मंकी कॅचर समाधान गिरी यांना पाचारण केले. शुक्रवारी त्याला मुहूर्त लागला. श्री. गिरी यांनी या माकडांना जेरबंद करण्यासाठी सकाळी सहा वाजताच पिंजरा लावला. शेंगदाणे व केळीची लालूच दाखवून दोन पिल्लासह सहा माकडांना या पिंज-यात बंद केले. परंतू इतर दोन नर असलेली माकडे मात्र पिंज-या जवळ येऊनही त्यात जात नव्हती, सायंकाळपर्यंत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता. 
अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...
त्रास मिटला
उच्छाद मांडणारी ही माकडे एकदाची पिंज-यात बंद केल्याने परिसरातील नागरिकांचा त्रास मात्र मिटला. त्यामुळे या भाकडांची भिती दूर झाली आहे. पिंज-यात पकडलेली ही माकडे बघण्यासाठी वनविभागाच्या रोपवाटिकेत दिवसभर अनेकांनी हजेरी लावली होती.

(संपादन : प्रतापअवचार)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed district monkeys gang arreste