esakal | हजार वेळा मागणी करुनही दुर्लक्षच; अखेर त्यांनी स्वतःला रस्त्यातच घेतले गाडून !
sakal

बोलून बातमी शोधा

बीड.jpg

नगरपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष. 

आपल्या मागणीसाठी गीतेवाडी ग्रामस्थांकडून अनोखे आंदोलन करण्यात आले..

हजार वेळा मागणी करुनही दुर्लक्षच; अखेर त्यांनी स्वतःला रस्त्यातच घेतले गाडून !

sakal_logo
By
सुधीर एकबोटे

पाटोदा (बीड) : अनेकवेळा रस्ता बनवण्यासाठी मागणी व निवेदन करून देखील नगरपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे पाहून आपल्या मागणीसाठी गीतेवाडी ग्रामस्थांकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी सध्या असलेलेल्या कच्चा रस्त्यावर खड्डे करून त्यामध्ये स्वतःला गाडून घेऊन व रस्त्यावर झालेल्या चिखलात बसून आपल्या मागण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले आहे. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

पाटोदा ते घोलपवस्ती, हनुमान वस्ती मार्गे धनगर जवळका या गावाला जोडणारा हा रस्ता आहे. हा परिसर पाटोदा नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक ६ च्या हद्दीत येतो पाटोदा नगरपंचायतीने विविध कामावर करोडो रुपये खर्च केले. परंतु या रस्त्याकडे पाटोदा नगरपंचायत ने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. दरवर्षी या रस्त्यावरून अगदी पायी चालणं सुद्धा मुश्किल होतं इथपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था होते. या रस्त्यावरून या परिसरातील शाळकरी मुले, नागरिकांची मोठी वर्दळ असते. प्रत्येक वर्षी मागणी केल्यानंतर नगरपंचायतीच्या वतीने दरवर्षी किरकोळ मुरूम वगैरे टाकून त्याची दुरुस्ती करण्यात येते. 

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन   

पुन्हा पुढच्या तीच परिस्थिती निर्माण होते. आठ दिवसापूर्वी आपल्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले होते मात्र त्या कडे नगरपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्या मुळे अखेर याबाबत अखेर प्रशासनाचे चे लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामस्थांनी खड्ड्यात गाडून घेऊन व सोबत चिखलात बसून आंदोलन केले. या नंतरही जर प्रशासनाने रस्त्याची मागणी पूर्ण केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला 

नगर पंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे .कोट्यावधी रुपये खर्चून थातूर मातूर काम करून गुत्तेदार अन अधिकाऱ्यांच चांगभलं करणाऱ्या नगर पंचायत विरोधात आम्ही ग्रामस्थानी स्वतःला गाडून घेत आंदोलन केले. आतातरी प्रशासन याकडे लक्ष देईल का हाच खरा प्रश्न आहे . चांगदेव गीते 

(संपादन-प्रताप अवचार)